श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप

Daily free khichdi prasad distribution to needy students by Sri Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Daily free khichdi prasad distribution to needy students by Sri Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust

श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप

श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप उपक्रमाचा शुभारंभ..!Daily free khichdi prasad distribution to needy students by Sri Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे  गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसाद वाटप 
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे: शनिवार दि १ जुलै २०२३ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ॲल्युमनाय असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद वाटप उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परीषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य, प्रसेनजित फडणवीस विद्यापीठाच्या सल्लागार समिती चे सदस्य श्री राजेश पांडे, माजी विद्यार्थी केंद्राचे संपर्क अधिकारी प्रा. प्रतीक दामा आदी उपस्थित होते.

श्री सद्गुरू शंकरमहारज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर यांनी सामाजिक बांधिलकीतून ट्रस्ट तर्फे भारती हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल व ससून जनरल हॉस्पिटल इत्यादी रूग्णालयां बरोबरच आता दररोज विद्यापीठाच्या प्रांगणात रिफेक्टरीच्या शेजारील शेड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद दुपारी १२ ते २ यावेळात मठा तर्फे उपलब्ध होईल असे सांगितले. मठामध्ये सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत खिचडी प्रसादाचे वाटप सुरु असते.

मा. चंद्रकांतदादा पाटीलांनी मठाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना ते म्हणाले,” श्री सद्गुरू शंकरमहारज समाधी ट्रस्टचा हा अतिशय गरजेचा व स्तुत्य उपक्रम आहे. जे विद्यार्थी वसतीगृहात रहात नाहीत, तसेच अत्यंत गरीब परिस्थितीतून पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यांची अनेक वेळा जेवणाची गैरसोय होते. अनेकांना दोन वेळचा डबा लावणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना हा शंकर महाराजांचा प्रसादरूपी आशीर्वादच मिळणार आहे.” शेगाव येथील गजानन महाराजांचे संस्थान प्रमाणे श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी ट्रस्ट देखील समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे असे सांगून त्यांनी ट्रस्टच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रा. संजय ढोले, संचालक, एस पी पी यु ॲल्युमिनाय असोसिएशन यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *